...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो. 

Updated: May 24, 2015, 06:37 PM IST
...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन title=

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो. 

आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर...
आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर अंपायर दोन्ही टीम्सना 5-5 ओव्हर्स खेळवण्याचा प्रयत्न करतील. 5-5 ओव्हर्सही खेळता आल्या नाही तर, सामना दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. सोमवार हा दिवस फायनलसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. रविवारी सामना जेथे थांबेल तेथून पुढे सोमवारी सामना खेळवला जाईल. जर सोमवारी देखील सामना खेळवणं शक्य नाही झालं तर, सुपर ओव्हर घेण्यात येईल. 

जर पावसामुळे सुपर ओव्हरही खेळवणं अंपायर्सना शक्य झालं नाही तर, लीग स्टेजमध्ये अव्वल स्थानी राहण्याचा फायदा चेन्नईला मिळेल. त्यामुळे अव्वल स्थानी असल्याने चेन्नईला विजयी घोषित करण्यात येईल. चेन्नई दोन वेळा आयपीएल चॅम्पियन झाली आहे, तर मुंबईने एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 

मात्र पाऊस पडू नये आणि फायनलचा सामना रोमांचक व्हावा अशीच प्रत्येक क्रिकेट रसिकाची इच्छा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.