नवी दिल्ली : कॅन्सरशी लढा देऊन मैदानात नव्याने उभा ठाकल्यानंतर युवराजसिंहने अनेकांना प्रेरणा दिली, मात्र युवराज असा नैराश्यवादी झाल्या सारखा का बोलतोय, असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडलाय.
भारतीय संघात परतण्यात यश आले नाही तर आपल्याला खूप दुःख होईल. गेली दोन वर्षे कामगिरीत चढऊतार येत आहेत. त्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळणे हे माझ्या हाती नाही. कदाचित मला संघात पुन्हा स्थान मिळेलही. शक्यता अशीही आहे की, मी कदाचित भारतासाठी यानंतर कधीही खेळू शकणार नाही. कदाचित मी खेळेनही. प्रयत्न करणे माझ्या हातात आहे, असे मत भारताचा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने व्यक्त केले आहे.
विस्डेन इंडियाशी बोलताना युवराजने सांगितले की, 'हरभजनसिंग, वीरेंदर सेहवाग, गौतम गंभीर या खेळाडूंशी आपण जुन्या दिवसांच्या आठवणींबद्दल बोलतो.
भारतातर्फे खेळताना एकत्र घालविलेले क्षण आम्ही पुन्हा आठवतो. आता आम्ही संघात नसलो तरी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा आणि कायम कार्यरत राहायला हवे.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.