यदा कदाचितच मी टीम इंडियासाठी खेळू शकेल – युवी

आता आपण पुन्हा टीम इंडियामध्ये खेळू शकणार का? असा विचार आपल्या नेहमी मनात येतोय, असं क्रिकेटर युवराज सिंह यानं म्हटलंय. सोबतच, भारतीय क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी जर आपण अयशस्वी ठरलो तर हे खूप त्रासदायक असेल, असंही त्यानं म्हटलंय. 

Updated: Oct 30, 2014, 08:13 AM IST
यदा कदाचितच मी टीम इंडियासाठी खेळू शकेल – युवी title=

नवी दिल्ली : आता आपण पुन्हा टीम इंडियामध्ये खेळू शकणार का? असा विचार आपल्या नेहमी मनात येतोय, असं क्रिकेटर युवराज सिंह यानं म्हटलंय. सोबतच, भारतीय क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी जर आपण अयशस्वी ठरलो तर हे खूप त्रासदायक असेल, असंही त्यानं म्हटलंय. 

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला यशस्वीपणे तोंड दिल्यानंतर युवराजनं भारतीय टीममध्ये काही दिवस जागा मिळवली होती. युवी शेवटचं डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या वनडेमॅचमध्ये खेळला होता. 

‘टीम इंडियामध्ये जागा मिळवणं हेच माझं लक्ष्य आहे. पण जेव्हा तुम्ही टीममध्ये जागा मिळवू शकण्यात अपयशी ठरता तेव्हा खूप निराश व्हायला होतं. मागचे दोन वर्ष खूप उतार-चढाव पाहायला मिळाला. मला निवडलं जावं किंवा नाही हा निर्णय घेणं काही माझ्या हातात नाही. काही गोष्टी बदलतील अशी आशा आहे आणि मला पुन्हा एकदा निवडला जाईल अन्यथा माझं आयुष्यच निराशाजनक होईल. मी केवळ सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करू शकतो’ असं युवीनं ‘विजडन इंडिया’मध्ये बोलतना म्हटलंय.

पण, युवी पूर्णत: निराश झालेला नाही. पुन्हा टीम इंडियामध्ये खेळायची संधीच मिळणार नाही का? असं तुझ्या मनात येतं का? असा प्रश्न विचारल्यावर ‘निश्चितच अशी शक्यता आहे की मला भारतातर्फे पुन्हा एकदा खेळायला मिळू शकतं’ असा आशावाद युवीनं व्यक्त केला. यासाठी, आपण शक्य तेवढे प्रयत्न करणार असल्याचंही त्यानं म्हटलंय. 

टीम इंडियासाठी खेळताना हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यासोबत घालवलेल्या काही चांगल्या दिवसांच्या आठवणी युवीच्या मनात ताज्या आहेत. ‘आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ते आम्ही सोबत घालवलेली वर्ष आमच्या आयुष्यातील शानदार वर्षे होती. पण, जेव्हा तुम्ही टीममध्ये नसता तेव्हाही तुमचं आयुष्य पुढेचं सरकत राहतं. तुम्हाला केवळ सकारात्मक राहण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज असते’. 

‘दलीप ट्रॉफी, रणजी वन डे आणि इतर मॅज मला खेळायला मिळाल्या तर हा माझ्यासाठी मोठी संधी असेल. टीम इंडियामध्ये मी जागा बनविली तरी माझ्यासाठी ती मोठी गोष्ट असेल. भारताकडून वर्ल्डकपमध्ये खेळणंही शानदार असेल... पण, असं झालं नाही तरी आयुष्य सुरुच राहील. ही गोष्ट स्वीकार करणं थोडं कठिण असेल पण मला हे सत्य स्वीकारावंच लागेल’ असंही यावेळी युवीनं म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.