आयसीसीच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर कायम

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली आजही चौख्या स्थानावर कायम आहे, शिखर धवन सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. 

Updated: Mar 31, 2015, 01:41 PM IST
आयसीसीच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर कायम title=

दुबई : आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली आजही चौख्या स्थानावर कायम आहे, शिखर धवन सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. 

कोहली आणि धवन यांच्याव्यतिरिक्त भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत आहे. धोनी क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. 

तर, भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सात स्थानांची प्रगती करत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आमि पाकिस्तानच्या मिस्बा उल हकसह बारावे स्थान मिळविले आहे. रोहितने विश्वकरंडक स्पर्धेत ३३० धावा केल्या होत्या. 

फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलर्स पहिल्या स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रमवारीत विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या आणि भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आयसीसीकडून ऑस्ट्रेलियाला १ लाख ७५ हजार डॉलरचे आणि भारताला ७५ हजार डॉलरचे बक्षीस मिळाले आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत स्पर्धेचा मानकरी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचला आहे. स्टार्क प्रथमच अव्वल दर्जाचा गोलंदाज झाला आहे. 

स्टार्कने विश्वकरंडकात २२ बळी घेतले होते. यापूर्वी तो सातव्या स्थानावर होता. तर, भारताचा उमेश यादवने पहिल्या २० गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.