आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन

आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.

Updated: Nov 29, 2015, 11:23 PM IST
आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन title=

दुबई : आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.

श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये सुनील नारायण याच्या विरोधात तक्रार केली गेली होती. त्यांनतर 17 नोव्हेंबरला लोगबोरो विद्यापीठामध्ये आयसीसीच्या मान्यताप्राप्त केंद्रामध्ये त्याचं परिक्षण केलं गेलं. 

परिक्षणात असं आढळून आलं की बॉलिंग करत असताना त्याचा हाताचा कोपर हा 15 डिग्रीपेक्षा अधिक वळते. आयसीसीच्या नियमानुसार तो इतर कोणत्याही देशाच्या इतर स्पर्धांमध्ये नाही खेळू शकणार. पण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या परवानगीने तो स्थानिक पातळीवर खेळू शकतो.

खेळाडूने जर त्याच्या अॅक्शनमध्ये बदल केला तर तो पुन्हा परिक्षणसाठी अर्ज करू शकतो.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.