'धोनीने सांगितलं तर चोवीसाव्या मजल्यावरून उडी मारेन'

वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होऊनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे टीमबाहेर जावे लागले,  अखेर निराश झालेल्या ईशांत शर्माने आपल्याला कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने २४ व्या मजल्यावरून उडी मारायला सांगितले तर क्षणाचाही विचार न करता मी उडी मारेन, असे म्हटले आहे.

Updated: Apr 6, 2015, 06:00 PM IST
'धोनीने सांगितलं तर चोवीसाव्या मजल्यावरून उडी मारेन' title=

हैदराबाद : वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होऊनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे टीमबाहेर जावे लागले,  अखेर निराश झालेल्या ईशांत शर्माने आपल्याला कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने २४ व्या मजल्यावरून उडी मारायला सांगितले तर क्षणाचाही विचार न करता मी उडी मारेन, असे म्हटले आहे.

नाराज ईशांत म्हणतो...
'वर्ल्डकप बाहेर जाणे मला स्वीकारणे अवघड होते. मी संघात असताना सर्वजण मला दुखापतीतून सावरण्यासाठी खूप मदत करत होते. संघातील सहाय्यक मार्गदर्शक आणि धोनीने मला योग्यरित्या मार्गदर्शन केले. तेव्हा मी मानसिकरित्या खूप खचलो होते. त्यावेळी धोनीने मला धैर्य देत यातून सावरले. त्यामुळे त्याने मला चोवीसाव्या मजल्यावरून उडी मारण्यास सांगितले, तरी मी मारेन. या दुखापतीतून सावरून सध्या मी नियमित सराव करत आहे. बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करून मी माझी तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा मी निर्णय घेतला असून, त्यासाठी सज्ज आहे.'

ईशांतची वर्ल्डकप टीम इंडियात निवड करण्यात आली होती. पण, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला ऐनवेळी टीमबाहेर जावे लागले आणि त्याच्याजागी मोहित शर्माची निवड करण्यात आली. 2011 च्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड झाली नव्हती आणि यावेळी निवड झालेली असतानाही दुखापतीमुळे वर्ल्डकपमध्ये खेळता न आल्याने ईशांत खूप नाराज होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.