आयसीसीच्या क्रमवारीत भारत नंबर वन

इंग्लंडमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आणि काल झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभव केल्यानंतर सोमवारी प्रदर्शित झालेल्या आयसीसीच्या नवीन वनडे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Updated: Sep 1, 2014, 04:58 PM IST
आयसीसीच्या क्रमवारीत भारत नंबर वन title=

दुबई : इंग्लंडमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आणि काल झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभव केल्यानंतर सोमवारी प्रदर्शित झालेल्या आयसीसीच्या नवीन वनडे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

आयसीसीने म्हटलं की, ''रविवारी हरारेमध्ये त्रिकोणीय मालिकेच्या एका सामन्यात झिम्बाब्वेने आस्ट्रेलियाला तीन विकेटने पराभव केल्यानंतर, आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत विश्व विजेता भारत नंबर एकवर आला आहे.

इंग्लंड विरूद्ध नॉटिंघममध्ये तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारत 114 अंकाने ऑस्ट्रेलियासोबत संयुक्तपणे नंबर एकवर होती पण झिम्बाब्वेने 31 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर दुसरा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ क्रमांक एकवर पोहचली आहे. 

या पराभवानंतर आस्ट्रेलियाला तीन रेटिंग अंकांचं नुकसान झालं आहे. ऑस्ट्रेलिया आता दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंकेनंतर चौथ्य़ा स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियाचे आता 111 अंक आहे.

ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे विरोधात विजय मिळवणारा दक्षिण अफ्रीका 113 अंकासोबत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे ही 111 अंक आहे.

विश्व चॅम्पियन भारताला जर क्रमांक एक कायम ठेवायचा असेल तर भारताला इंग्लंडच्या विरूद्ध बाकी दोन सामनेही जिंकावे लागतील आणि ऑस्ट्रेलिया फाइनलमध्ये पोहोचलीतर दक्षिण अफ्रीकाकेला 2 सप्टेंबर किंवा 6 सप्टेंबरच्या सामन्यात पराभूत केलं पाहिजे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.