ह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग

फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. 

PTI | Updated: Nov 29, 2014, 08:02 AM IST
ह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग title=

मेलबर्न: फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले की, खेळाडू अजूनही शोकाकुल मनस्थितीत आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आणखी काही कालावधी हवा. सहा-सात दिवसांत यातून बाहेर पडणं अवघड आहे. त्यामुळं खेळाडू मानसिकदृष्टय़ा तयार झाल्यावरच कसोटीचं आयोजन करण्यात येईल. 

आपल्या सर्वांना क्रिकेटशी प्रेम आहे आणि फिलिपहून अधिक क्रिकेटवर कुणी प्रेम केलं नाही. खेळाडू मानसिकरित्या तयार असतील तेव्हाच सामने खेळविले जातील, असं सदरलँड यांनी स्पष्ट केलं. हय़ुजला चेंडू लागला त्या वेळी डेविड वॉर्नर, शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन आणि नाथन लिऑन हे मैदानावर उपस्थित होते. 

हय़ुजची अखेरची इच्छा काय होती, हे त्याच्या वडिलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सरदलँड यांनी सांगितलं. ते म्हणाले, की गेली काही तास फिलिप यांच्याशी बोलताना जाणवलं की ते आणि त्यांचे कुटुंब क्रिकेटवर खूप प्रेम करत होते. फिलिप इतरांपेक्षा अधिक क्रिकेटवर प्रेम करायचा आणि खेळ सुरू राहिला पाहिजे, हेच त्याला हवं होतं. पहिल्या टेस्टसंदर्भात आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी वारंवार चर्चा करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.      

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.