... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया

टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते. 

Updated: Mar 12, 2015, 02:57 PM IST
... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया  title=

मुंबई: टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते. 

पण जर क्रिकेटच्या अनिश्चिततेकडे पाहिलं तर प्रकरण उलटं पण होऊ शकतं आणि भारताला क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशसोबत नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळावी लागू शकते. ते कसं ते... तर टीम इंडिया पूल बीमध्ये सर्व मॅच जिंकून टॉपवर आहे. तर बांग्लादेश 'पूल ए'मध्ये चौथ्या स्थानावर आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये एका पूलची टॉप टीम दुसऱ्या पूलच्या चौथ्या नंबरच्या टीम सोबत मॅच खेळेल. 

भारताचं आपल्या पूल एमध्ये टॉपवर असणं ठरलेलंच आहे. याचप्रमाणे बांग्लादेशचंही पूल बीमध्ये चौथ्या स्थानावर असणं हे निश्चित आहे. म्हणून या दोन टीम क्वॉर्टर फायनलमध्ये भिडतील ही शक्यता सोपी मानली जाते. पण भारताला आपली अखेरची मॅच झिम्बाव्वेशी खेळणार आहे आणि या मॅचच्या जिंकण्या-पराभवावर भारताच्या टॉप पोझिशनवर काही परिणाम होणार नाहीय. तर बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक-एक मॅच खेळायची आहे आणि या मॅचच्या परिणामांवर क्वॉर्टर फायनलमध्ये टीमची लढाई बदलू शकते. 

ऑस्ट्रेलियानं आपल्या 5 मॅचमध्ये तीन मॅच जिंकत 7 पॉइंट्स मिळवलेत आणि ऑस्ट्रेलियाला आपली अखेरची मॅच स्कॉटलँडसोबत खेळायची आहे. तर बांग्लादेशनंही तीन मॅच जिंकत 7 पॉइंट्स मिळवलेत आणि अखेरच्या मॅचमध्ये न्यूझिलंडशी भिडायचं आहे. 

जर ऑस्ट्रेलिया आपली अखेरची मॅच हरतो आणि बांग्लादेश जर अखेरची मॅच जिंकेल तर बांग्लादेश दुसऱ्या नंबरवर आणि ऑस्ट्रेलिया चौथ्यानंबरवर जाईल. अशात भारताची क्वॉर्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. 
13 मार्चला बांग्लादेश विरुद्ध न्यूझिलंड आणि 14 मार्चला ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलँड मॅच भिडेल. त्यामुळं या मॅचकडे टीम इंडिया आणि इंडियन फॅन्सचीही नजर असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.