तिसऱ्या दिवसअखेर भारत साडेतीनशेपार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने चांगली धावसंख्या उभारली. दिवसअखेर भारताने सहा गडी गमावत साडेतीनशेपार मजल मारली. भारताचा डाव संपला तेव्हा तो चेतेश्वर पुजारा १३० आणि वृद्धिमन साहा १८ धावांवर खेळत होता.

Updated: Mar 18, 2017, 05:55 PM IST
तिसऱ्या दिवसअखेर भारत साडेतीनशेपार title=

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने चांगली धावसंख्या उभारली. दिवसअखेर भारताने सहा गडी गमावत साडेतीनशेपार मजल मारली. भारताचा डाव संपला तेव्हा तो चेतेश्वर पुजारा १३० आणि वृद्धिमन साहा १८ धावांवर खेळत होता.

भारत अजूनही पहिल्या डावात ९१ धावांनी पिछाडीवर असून अद्याप ४ फलंदाज शिल्लक आहे. या संपूर्ण दिवसात ऑस्ट्रेलियाला पाच विकेट मिळवण्यात यश मिळाले.

खांद्याला दुखापत झालेली असताना खेळण्यासाठी आलेल्या विराट कोहलीला केवळ ६ धावा करता आल्या. रहाणेही १४ धावांवर बाद झाला. सलामीवीर मुरली विजय ८२ धावांवर बाद झाला.