हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हातातोडांशी आलेला विजय मिळवता न आल्याने भारतीय संघासमोर आज मालिकेत आव्हान कायम राखण्य़ाचे भारताचे लक्ष्य आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होतोय. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने दोन धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते या मालिकेत १-०ने पुढे आहेत. त्यामुळे हा सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न झिम्बाब्वे करेल.
झिम्बाब्वेविरुध्द पहिल्या टी -20 लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून युवा खेळाडू बोध घेतील,अशी आशा भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली.युवा खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी आपल्या विकेट गमावल्यामुळे पाहुण्या संघाला 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.आज खेळल्या जाणा-या दुस-या लढतीत युवा खेळाडू या चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत,अशी आशा धोनीने व्यक्त केली.