भारताच्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये नवा इतिहास रचलाय. पोलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ वर्षीय नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत नवा विक्रम केलाय. 

Updated: Jul 24, 2016, 11:18 AM IST
भारताच्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास title=

नवी दिल्ली : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये नवा इतिहास रचलाय. पोलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ वर्षीय नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत नवा विक्रम केलाय. नीरजने 
८६.४८ मीटर अंतरावर भालाफेक केली. 

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणारा नीरज पहिला भारतीय अॅथलिट ठरलाय. यापूर्वी एकाही भारतीय अॅथलिटला ही किमया साधता आलेली नाही. 

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रॉबलरने ८०.५९ मीटर अंतराची नोंद करत रौप्यपदक मिळवले तर ग्रानाडाच्या अँडरसन पीटर्सने ७९.६५ मीटर अंतराची नोंद करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.