शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं आहे

Updated: Feb 4, 2016, 05:33 PM IST
शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं आहे. बॉल जुना झाल्यावर भारतीय बॉलर्सना बॉलिंग करता येत नाही, असं शोएब म्हणाला आहे. 

भारतीय बॉलर्सवर टीका करताना शोएबनं झहीर खानचं मात्र कौतुक केलं आहे. झहीर जुन्या आणि नव्या बॉलनं चांगली बॉलिंग करायचा, बॉल कसा हाताळावा हे झहीरला चांगलं कळायचं असं शोएब म्हणाला आहे. पण आता भारतीय बॉलर्सना रिव्हर्स स्विंग करता येत नसल्याची प्रतिक्रिया शोएबनं दिली आहे.

 

झहीर बरोबरचं शोएबनं भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विनचंही कौतुक केलं आहे. अश्विन हा जगातला सर्वोत्तम ऑफस्पिनर आहे. खेळपट्टी साथ देत असेल तर तो किती धोकादायक आहे, ते त्यानं वारंवार सिद्ध केलं आहे, तसंच तो बुद्धीमान असल्याचंही शोएब म्हणाला आहे. 

भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होत नसल्याची खंतही शोएबनं व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या मॅचचा थरार, रोमांच नव्या पिढीला अनुभवता येत नाही, हे निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया शोएबनं दिली आहे.