कायsss? विराटला चष्मा लागला?

मुंबई : नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया वि. भारत मालिकेत विराट कोहलीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. टी २० मालिकेतही त्याची कामगिरी फार महत्त्वाची राहिली होती.

Updated: Feb 4, 2016, 03:58 PM IST
कायsss? विराटला चष्मा लागला? title=

मुंबई : नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया वि. भारत मालिकेत विराट कोहलीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. टी २० मालिकेतही त्याची कामगिरी फार महत्त्वाची राहिली होती. पण, आता मात्र तो घरी परतलाय. घरी आल्यावर तो जरा लाइट मूडमध्ये असल्याचं दिसतंय.

गेले काही दिवस त्याची सोशल मीडियावरही खूप चर्चा होतेय... आणि महत्त्वाचं म्हणजे विराटही खूप दिवसानंतर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झालाय. त्याचा वर्कआऊटचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर खूप गाजला होता.

काल विराटने त्याचा चष्मा घातलेला एक सेल्फी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या या फोटोची खूप चर्चा झाली. काही कारणांनंतर त्याने तो फोटो इंस्टाग्रामवरुन काढून टाकला. पण मग त्याच्या फॅन्सनी त्याला तो पुन्हा अपलोड करण्याची विनंती केली.

'मी माझा फोटो डीलिट करुन गुन्हा केलाय असं मला वाटतंय. हा हा हा. सॉरी. हा घ्या, पुन्हा अपलोड करतोय' या कॅप्शनसोबत त्याने तो पुन्हा अपलोड केला.

विराटला श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तो जरा कूल मूडमध्ये आहे असंच वाटतंय.

 

 

Feels like I committed a crime deleting this picture. Haha sorry guys . Here it is again.

A photo posted by Virat Kohli (@virat.kohli) on