युवराजला डच्चू, तीन नवे चेहरे टीम इंडियात

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या पाच वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठीही युवराज सिंगला डच्चू देण्यात आला आहे.

Updated: Aug 5, 2014, 09:00 PM IST
युवराजला डच्चू, तीन नवे चेहरे टीम इंडियात title=

मुंबई: भारताच्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या पाच वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठीही युवराज सिंगला डच्चू देण्यात आला आहे.
 
संदीप पाटील यांच्या राष्ट्रीय निवड समितीने तीन नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी दिली आहे. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी, केरळचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन आणि रेल्वेचा लेग स्पिनर करन शर्मा या तिघांचा त्यात समावेश आहे.
 
इंग्लंड दौऱ्यात घोट्याच्या दुखापतीनं त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
 
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ - धोनी, कोहली, धवन, रोहित शर्मा, रहाणे, रैना, जडेजा, अश्विन, बिनी, भुवनेश्वर, मोहम्मद शमी, अंबाती रायडू, उमेश यादव, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, करण शर्मा

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.