आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन

'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय. 

Updated: Apr 8, 2016, 10:37 PM IST
आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन title=

मुंबई : 'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय. 

या ओपनिंग सेरेमनीमध्ये कतरिना कैफ, रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि हनी सिंग यांच्यासहीत अनेक बॉलिवूडमंडळी परफॉर्म करताना दिसणार आहेत. 

यानिमित्तानं, अमेरिकन पॉप स्टार क्रिस ब्राऊन पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सोनी मॅक्स आणि सोनी सिक्स वर सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. 

आयपीएल ९ मध्ये पहिली मॅच रंगणार ती मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजाईंटस् या दोन टीममध्ये... ही मॅच मुंबईमध्ये खेळली जाणार आहे.