मुंबई : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणे मुंबई इंडियन्स सोबत झालेल्या सामन्यानंतर झोपू शकला नाही. एक खराब फटका मारल्यानंतर तो बाद झाला त्या रात्री तो झोपू शकला नाही. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरोधात त्याने ही भरपाई करून शानदार खेळी केली.
दिल्ली विरोधात नाबाद ९१ धावा काढणाऱ्या अजिंक्यने राजस्थान रॉयल्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या सामन्यात विनय कुमारच्या चेंडूवर खराब फटका मारून १६ धावांवर बाद झाल्यावर मला खूप दुःख झाले. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. संपूर्ण वेळ मी त्या फटक्याबद्दल आणि पराभवावर विचार करत बसलो. मला माहीत आहे की मी चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे चांगला निकाल देऊ इच्छितो.
दिल्ली विरूद्धच्या सामन्यात रहाणेने ५४ चेंडूत तीन षटकार आणि नौ चौकारांसह नाबाद ९१ धावा केल्या. तर करूण नायर सह (३८ चेंडूत ६१ धावा) ११३ धावांची भागीदारी करून राजस्थान रॉयल्सने दोन बाद १८९ धावांपर्यंत मजल मारली.
आयपीएल ८ मध्ये अजिंक्य रहाणे याने ४३० धावा केल्या असून ४०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.