केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले - मॉर्गन

 इंग्लडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने  व्यक्त केले आहे. 

Updated: Jan 16, 2017, 05:01 PM IST
 केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले - मॉर्गन   title=

पुणे :  इंग्लडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने  व्यक्त केले आहे. 

जाधवने ७६ चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने १०५ चेंडूत १२२ धावांची खेळी केली. भारताने जिंकण्यासाठी ३५१ धावांचे लक्ष्य तीन विकेट राखून पार केले. 

मॉर्गन म्हणाला, मला दुःख या गोष्टीचे आहे की, आम्ही चार विकेट ६३ धावांवर घेतले होते. पण त्यानंतर आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आम्ही विचार केले नव्हते की केदार अशी फलंदाजी करेल. त्याने पहिल्या चेंडूपासून मारझोड करण्यास सुरू केली.  त्याने म्हटले की, त्याच्या संघाने केदार जाधवबद्दल होम वर्क केला होता. 

केदारच्या सर्व आंतरराष्ट्रीय मॅचेचे व्हिडिओ पाहिले होते. कोहलीबाबतही काही रणनिती आखली होती. पण ती चालू शकली नाही. चेंडू डोक्याच्या वरून निघून गेला नाही तर तो आऊट झाला असता. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याने बऱ्याच काळापासून स्वतःला सिद्ध केले आहे.