भारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला. 

Updated: Oct 29, 2015, 11:56 AM IST
भारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिजबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज मियाँदादनं सरकारच्या अंमलाखाली निर्णय घेत असल्याचं म्हटलं. तो म्हणाला, 'बीसीसीआय क्रिकेट बोर्ड नाही तर सरकारचं बोर्ड आहे.' 

पाकिस्तानच्या मागे येईल बीसीसीआय

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला, 'भारताचा इतर क्रिकेट देशांसोबतही खराब व्यवहार असतो आणि ही त्यांच्या अंताची सुरूवात आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत स्वत: पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा आग्रह करेल. सध्या बीसीसीआय आणि सरकार दोघंही पाकिस्तानसोबत चर्चेसाठी चांगल्या संबंधांसाठी गंभीर नाही.'

आणखी वाचा - व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील भांडणं

पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान नुकतेच भारत दौऱ्यावर होते. बीसीसीआय अध्यक्षांबरोबर त्यांची भारत-पाकिस्तान सीरिजसंदर्भात चर्चा होणार होती. पण ती झाली नाही आणि शहरयार पाकिस्तानला परतले. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सध्याच्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान सीरिज शक्य नसल्याचं म्हटलं होतं.

५८ वर्षीय जावेद मियाँयादने सगळ्या जगातील तीन क्रिकेट बोर्ड भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडवर सर्व क्रिकेटची ताकद आपल्याकडे ठेवत असल्याचा आरोप केला. 

पाकिस्तानला घाबरतो भारत

पाकिस्तानातील यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक जावेद मियाँदादने म्हटलं की, सतत काही काळानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दरम्यान अॅशेज सीरिज होते, मग भारत-पाकिस्तान दरम्यान सीरिज का होत नाही? भारत आमच्यासोबत खेळू इच्छित नाही कारण आमच्याकडून पराभवाची त्यांना भीती आहे. 

आणखी वाचा - व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.