लाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी!

लाटांवर स्वार झालेल्या राणीची... पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या धाडसी अशा सर्फिंगच्या खेळात अमेरिकेच्या किएला केनलीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या कामगिरीची दखल घेत किएलाला, 'प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Updated: May 14, 2016, 09:16 AM IST
लाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी! title=

नवी दिल्ली : लाटांवर स्वार झालेल्या राणीची... पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या धाडसी अशा सर्फिंगच्या खेळात अमेरिकेच्या किएला केनलीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या कामगिरीची दखल घेत किएलाला, 'प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

ही आहे किएला केनली... मोठ-मोठ्या लाटांवर ती चित्तथरारक कसरती करते. लाटांना मागे टाकत पुढे जाण्याचा तिचा छंद आहे. तिच्या या छंदाची दखल संपुर्णनं जगानं घेतली आहे. 


किएला केनली

'किएला प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर'

'किएला प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कार जिंकणारी जगातील पहिली महिला आहे. अॅन्युअल बिग वेव अवॉर्ड कॅटेगरीत पुरस्कार मिळणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अमेरिकेत सर्फिंगमध्ये दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 

अमेरिकेच्या हवाईमध्ये राहणाऱ्या किएलाची चॅम्पियन बनण्याची कहाणी इंटरेस्टिंग आहे. तिला आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक आव्हानं पार करावी लागली. सुरुवातीला तर 'सर्फिंग हा पुरुषांचा गेम आहे आणि तू एक महिला आहे. त्यामुळे तू सर्फिंग करुच शकणार नसल्याचं' तिला सांगितलं गेलं. मात्र, तिला जी गोष्ट करु नको असं सांगितलं गेलं तेच  किएलानं केलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ती चॅम्पियन बनली.

किएलाला ज्याप्रकारे सर्फिंग करण्यावाचून रोखलं गेलं. त्याच घटनांमुळे तिला आपलं ध्येय गाठण्यासाठी मदतगार ठरल्या.   किएलानं आपलं लक्ष्य गाठण्यासाठी तासनतास प्रॅक्टिस केली. १७ व्या वर्षी ती प्रोफेशनल सर्फर बनली आणि त्यानंतर ती बघता - बघता वर्ल्ड चॅम्पियन झाली. तिचं यश हे तरुणाईसाठी एक आदर्श आहे. तिनं सिद्ध करुन दाखवलं की, मुलींना कमी लेखण्याची चूक करु नका... कारण हार न मानणं ही मुलींची खासियत आहे.