गुजरात लायन्सविरुद्ध कोहलीचा धमाका

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीनं गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली आहे.

Updated: Apr 24, 2016, 06:16 PM IST
गुजरात लायन्सविरुद्ध कोहलीचा धमाका title=

राजकोट: रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीनं गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली आहे. विराटनं 63 बॉलमध्ये 11 फोर आणि एका सिक्सच्या मदतीनं ही सेंच्युरी केली. 

कोहलीच्या या सेंच्युरीमुळे आरसीबीनं 20 ओव्हरमध्ये 180 रन बनवले. कोहलीनं शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला एक रन काढली त्यानंतर शेवटच्या तीन बॉलमध्ये एक सिक्स आणि दोन फोर मारून आपली सेंच्युरी पूर्ण केली. 

टी 20 मधली विराट कोहलीची ही पहिलीच सेंच्युरी आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 90 रन त्याच्या सर्वाधिक होत्या. आयपीएलमध्ये कोहलीनं 128 मॅचमध्ये 35.04 च्या सरासरीनं 3504 रन बनवल्या आहेत. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये 22 हाफ सेंच्युरी आहेत. तसंच त्यानं आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 311 फोर आणि 119 सिक्स मारल्या आहेत.