ईशांत चमकला, कोहली, रोहित ठेपाळले

ईशांत शर्माने चार ओव्हरमध्ये पाच गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ‘स्टार‘ पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारताच्या श्रीलंका दौऱ्या श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना सुरू आहे. 

Updated: Aug 7, 2015, 07:28 PM IST
ईशांत चमकला, कोहली, रोहित ठेपाळले title=

कोलंबो : ईशांत शर्माने चार ओव्हरमध्ये पाच गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ‘स्टार‘ पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारताच्या श्रीलंका दौऱ्या श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना सुरू आहे. 

भारताचा पहिला डाव ३५१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर श्रीलंका अध्यक्षीय संघाचा पहिला डाव ३१ ओव्हरमध्ये १२१ धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आले. पहिल्या डावात भारताला २३० धावांची आघाडी मिळाली. 

भारताने भक्कम आघाडी मिळविली असल्याने पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या कोहली आणि रोहितने दुसऱ्या डावाची सुरवात केली. मात्र, येथेही हे दोघे अपयशीच ठरले. रोहित केवळ आठ, तर कोहली १८ धावा करून बाद झाला. पहिल्या दहा षटकांतच भारताने रोहित, कोहली आणि वृद्धिमान साहा हे तीन फलंदाज गमावले होते. चेतेश्‍वर पुजारा आणि केएल राहुल यांनी डाव सावरत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा भारताने ३३ षटकांत तीन गडी गमावत ८५ धावा केल्या होत्या आणि राहुल ३७, तर पुजारा 19 धावांवर खेळत होते. 

या आधी, ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंका अध्यक्षीय संघाची फलंदाजी कोसळली. त्यांच्या पहिल्या चार फलंदाजांनी मिळून केवळ पाच धावा केल्या आणि त्यातही तिघे शून्यावरच बाद झाले. विशेष म्हणजे, या चार फलंदाजांमध्ये लाहिरु थिरिमन्ने आणि उपुल थरंगा या अनुभवी खेळाडूंचाही समावेश होता. मिलिंद श्रीवर्धने (३२), निरोशन डिकवेला (४१) आणि दानुश गुणतिलका (२८) या तीनच फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या. ईशांतचे पृथ:करण ७ षटके, १ निर्धाव, २३ धावा आणि पाच बळी असे राहिले. वरुण ऍरॉन आणि आर. आश्‍विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर अनुभवी ऑफस्पिनर हरभजनसिंगने एक गडी बाद केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.