हॅम्लिटन : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याचे शतक... रोहित शर्माचे अर्धशतक... मोहम्मद शमीच्या तीन विकेट, अश्विनच्या दोन विकेटच्या जोरावर भारताने आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला.
भारताच्या या विजयाने भारताने २०१५ च्या वर्ल्ड सलग पाच विजयांची नोद केली आहे. तसेच २०११ च्या वर्ल्ड कपपासून सलग ९ सामने जिंकण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
तसेच भारताने या वर्ल्ड कपमध्ये पाचही संघाना सर्वबाद करण्याचा नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
आज सुरूवातीला आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या सलामीवीरांनी तडाखेबंद फलंदाजी करत ८९ धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर ठराविक अंतराने आयर्लंडच्या विकेट घेण्यास भारताला यश आले. भारताकडून मोहम्मद शमी याने ३, अश्विन २, उमेश यादव, सुरेश रैना, मोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयर्लंडकडून सर्वाधिक धावा नायल ओब्रायन याने ७५ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार पोटरफिल्ड याने ६७ धावा केल्या. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर आयर्लंडने २५९ धावांपर्यंत मजल मारली.
भारताने २६० धावांचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागिदारी केली. सामन्यात शिखर धवन (100) आणि रोहित शर्मा (64) धावांचे मोलाचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहली (44*) आणि अजिंक्य राहणे (33*) यांनी भारताला ३७ व्या षटकात विजयश्री मिळवून दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.