जयवर्धनेनं केलं भावूक होऊन टेस्टला अलविदा

आपल्या १७ वर्षाची कारकिर्द उत्कृष्टपणे संपवल्यानतंर हा खेळाडू खूपच भावूक झाला. या खेळाडूने १४९ टेस्टमध्ये ११८१४ रन्स बनवले ज्यात ३४ शतकं आहेत. शेवटच्या टेस्टमध्ये याने ४ आणि ५४ रन केलेत.

Updated: Aug 18, 2014, 09:30 PM IST
जयवर्धनेनं केलं भावूक होऊन टेस्टला अलविदा title=

कोलंबो: आपल्या १७ वर्षाची कारकिर्द उत्कृष्टपणे संपवल्यानतंर हा खेळाडू खूपच भावूक झाला. या खेळाडूने १४९ टेस्टमध्ये ११८१४ रन्स बनवले ज्यात ३४ शतकं आहेत. शेवटच्या टेस्टमध्ये याने ४ आणि ५४ रन केलेत.

याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ३७४ रन्सची ऐतिहासिक खेळी केली होती. त्या वेळेस संगकारा (२८७) सोबत ६२४ रन्सची जागतिक विक्रमी भागीदारी केली होती. याने एसएससीवर २७ टेस्ट मध्ये २९२१ रन्स बनवले जे एका मैदानावर कोणत्याही एका फलंदाजाने बनवले गेलेले सर्वाधिक रन्स आहे.

अशा या महान खेळाडूचे नाव आहे महेला जयवर्धने. जयवर्धने याने श्रीलंकेचं कर्णधारपद ही भूषवलं आहे. त्याच्या कर्णधारीतेखाली श्रीलंकेने १८ टेस्ट जिंकले.

श्रीलंकेने पाकिस्तानवर शेवटतच्या टेस्टमध्ये 105 रन्सने विजय मिळवत जयवर्धनेला निरोप दिला. श्रीलंकेच्या खेळाडू्ंनी विजय मिळवल्यानंतर जयवर्धनेला खांद्यावर उचलून घेतलं. या महान फलंदाजाला निरोप देण्यासाठी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे सह 4000 प्रेक्षक उपस्थित होते.

जयवर्धनेने एप्रिलमध्ये श्रीलंकेला विश्व टी20 मध्ये विजय मिळवून दिल्यानंतर टी-20 मधून संन्यास घेतला होता. आता तो केवळ एक एकदिवसीय क्रिकेट खेळेल. फटाक्यांच्या आतिशबाजीत पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जयवर्धनेने म्हटलं ‘मला नाही माहित कि काय बोलायचं आहे पण मी तुम्हाला विश्वास देतो की मला रडायला नाही येणार.

'मी तुमच्या सर्वांनवर प्रेम आहे. एवढी वर्षे तुम्ही माझं समर्थन केलं त्यामुळे आभार. अजूनही काही बाकी आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की वर्ल्ड कपमध्ये मी माझं सर्व काही ओतून देईल. माझ्या सर्व सहकार्याना धन्यवाद. एवढी वर्षे श्रीलंकेकडून खेळने खूपच छान राहीलं. मी ही कॅप नेहमी सन्मान आणि पॅशनसाठी घातली.’

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.