मुंबई : आयपीएलचा दहावा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वीच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मोठा झटका बसला.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.
गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघावर बंदी घातल्यानंतर पुण्याचा नवा संघ स्पर्धेत उतरला. गेल्या मोसमात धोनीच्या नेतृत्वाखाली पुण्याने 14 सामन्यांपैकी केवळ 5 सामन्यांत विजय मिळवला.
तसेच या आयपीएलमध्ये धोनीची कामगिरीही तितकीशी प्रभावी राहिली नव्हती. त्याला 12 डावांत केवळ 284 धावा करता आला होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.
याआधी धोनीने आयपीएलच्या नऊ मोसमांत चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2008. 2010 आणि 2011 मध्ये जेतेपद पटकावले होते.
धोनीने काही दिवसांपूर्वीच भारताच्या वनडे आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर आता विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय.