धोनीने लव यू नाही, काही आणखी बोलून साक्षीला केले होते प्रपोज

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वभावाने खूप कूल आहे. धोनीने लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वजणांना धक्का बसला होता. 

Updated: Feb 1, 2016, 07:32 PM IST
 धोनीने लव यू नाही, काही आणखी बोलून साक्षीला केले होते प्रपोज title=

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वभावाने खूप कूल आहे. धोनीने लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वजणांना धक्का बसला होता. 

धोनीने आपले प्रेम व्यक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने जाहीर केले होते. 

कसे केले होते प्रपोज 

मीडिया रिपोर्टनुसार एक टेलिव्हिजन चॅनलशी बोलताना धोनीने सांगितले की, तो त्याची पत्नी साक्षी लग्नापूर्वीपासून ओळखत होता. ते दोघे एकमेकांना डेट करत होते. दोघे सुट्टी घालविण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. व्हॅलेंटाइनचा दिवस होता. धोनी तिला सांगणार होता, की ती त्याला किती आवडते. त्याने तिला 'लव यू' नाही म्हटले थेट सरळ 'विल यू मॅरी मी' असे विचारले आणि साक्षीने लगेच हो म्हटले. 

टीम इंडियाचा कर्णधार माहीने साक्षीशी २०१०मध्ये लग्न केले होते. त्याच्या लग्नाला ६ वर्ष झाले असून त्याला जीवा नावाची एक गोंडस मुलगी आहे. 

धोनीने कधी आपले पर्सनल लाइफ एक्सपोज केले नाही. त्याने गुपचूप लग्न केले होते. त्यात कुटुंबातील काही जणच सामिल झाले होते.