चेन्नई : 'मला धोनीसारख बनायचंय' असं म्हणतोय, इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी बॅटसमन मायकल हसी....
मायकल हसीला भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीप्रमाणे धैर्यवान बनायचंय... 'मला त्याच्याप्रमाणे शक्ती मिळवायचीय... धैर्य राखून मैदानात उतरण्याचं त्याचं कसब मला आत्मसात करायचंय. धोनी शेवटी शेवटी शानदार बॅटिंग करतो... कारण तो एक शांत डोक्याचा व्यक्ती आहे आणि तो जे काही करतो ते अगदी शांतपणे योजनाबद्ध पद्धतीनं खेळतो' असं हसीनं म्हटलंय.
आपली आणि धोनीची तुलना करताना हसी म्हणतो, मी अनेकदा गेमच्चा शेवटी खेळताना आमच्या रन्सची गती थंड असेल तर घाबरून जातो... गोंधळून जातो. पण, धोनी मात्र नेहमीच सकारात्मक पद्धतीनं खेळतो.... जसं काही तो 'घाबरण्याची काहीही गरज नाही', असं त्याच्या खेळातूनच सांगत असतो.
आयपीएलच्या गेल्या सत्रात हसी मुंबई इंडियन्स टीमकडून खेळत होता. परंतु, यंदाच्या सत्रात मात्र तो सुपर किंग्जमध्ये परतलाय.
आपल्या अगोदरच्या टीममध्ये परतून खूप चांगलं वाटतंय. या टीममध्ये माझे अनेक चांगले मित्र आहेत आणि या टीमशी माझ्याकडे अनेक चांगल्या आठवणीही आहेत, असंही हसीनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.