'आयपीएल ८'ची आज रंगारंग सुरुवात, पावसामुळं पडू शकतो व्यत्यय

'आयपीएल ८'ची आज दमदार सुरूवात होणार आहे. कोलकाताच्या साल्टलेक परिसरातील युवा भारती क्रीडांगणात आज संध्याकाळी सात वाजता 'आयपीएल ८'च्या रंगारंग सोहळ्याला सुरूवात होईल. 

Updated: Apr 7, 2015, 11:57 AM IST
'आयपीएल ८'ची आज रंगारंग सुरुवात, पावसामुळं पडू शकतो व्यत्यय title=

कोलकाता: 'आयपीएल ८'ची आज दमदार सुरूवात होणार आहे. कोलकाताच्या साल्टलेक परिसरातील युवा भारती क्रीडांगणात आज संध्याकाळी सात वाजता 'आयपीएल ८'च्या रंगारंग सोहळ्याला सुरूवात होईल. 

आयपीएल टीमचे कॅप्टन, खेळाडू आणि काही व्हिआयपी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित असतील. उद्घाटन समारंभात बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता फरहान अख्तर आणि शाहिद कपूर आपला जलवा दाखवणार आहे. संगीत आणि नृत्याचा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आठवणीतला राहील. 

आयपीएल सिझन ७ची चॅम्पियन टीम कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीर आयपीएल ट्रॉफी परत 
ठेवतील आणि कार्यक्रमाची सुरूवात होईल. 'आयपीएल ८'च्या आठव्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान वादळ आणि पाऊस व्यत्यय आणू शकतात. हवामान विभागानुसार मंगळवारी दुपारी पावसासोबत वादळ येण्याचीही शक्यता आहे आणि याचा परिणाम म्हणजे जवळपास ५० किलोमीटर परिसरात पाऊस पडू शकतो.

वर्ष २०१३मध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे चर्चेत असलेली ४७ दिवस चालणारी ही टूर्नामेंट बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या मॅचने होईल. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात ही मॅच होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.