'आयपीएल' सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्सना मोठा झटका

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'आयपीएल-८' साठी सर्वच टीम्सची जय्यत तयारी सुरू आहे. पण, स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका बसलाय.

Updated: Apr 9, 2015, 06:32 PM IST
'आयपीएल' सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्सना मोठा झटका title=

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'आयपीएल-८' साठी सर्वच टीम्सची जय्यत तयारी सुरू आहे. पण, स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका बसलाय.

वर्ल्डकप २०१५ मध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा मानकरी ठरलेला आस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये सहभागी होणार नाही... यामुळे, रॉयल चॅलेंजर्स अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. 

'वर्ल्ड कप २०१५'मध्ये २२ विकेट घेणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू मिशेल स्टार्क दुखापतीमुळे तीन आठवड्यापर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिजियो एलेक्स कुंटोरिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप दरम्यान स्टार्कच्या गुडघ्याला दूखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही दिवस आरामाची गरज आहे.

रॉयल चॅंलेजर्स बंगळुरुनं स्टार्कला पाच कोटी देऊन आपल्या टीमसाठी खरेदी केलंय. क्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू या टीममध्ये आहेत. वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या जोरावर स्टार्क आयसीसी रॅंकिंगमध्ये नंबर वन खेळाडू ठरला आहे.

स्टार्कने तंदुरुस्त होऊन लवकरच रॉयल चॅंलेजर्स बंगळुरूची बॉंलिंगची धुरा सांभाळावी, अशी आशा टीमकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.