व्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत. 

Updated: Apr 2, 2015, 11:05 AM IST
व्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात title=

मुंबई : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत. 

विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांचा मिळून एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. #Respect2Protect (संरक्षणासाठी आदर) अशी टॅगलाईन असणारा हा व्हिडिओ 'स्त्रियांचं संरक्षण' म्हणजे नेमकं काय? याबद्दल भाष्य करतोय. 

स्त्रियांकडे लैंगिकतेच्या दृष्टीनं पाहणं, घरगुती छळ, मानसिक आणि शारिरीक छळ या घटनांनी आयकॉन समजल्या जाणाऱ्या या क्रिकेटर्सना एकत्र आणलंय. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण आणि त्यांचा आदर करण्याचा संदेश देताना हे क्रिकेटर्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 

'माय चॉईस'द्वारे हा व्हिडिओ २४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलाय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.