नवी दिल्ली : बीबीसीआयनं टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी भारताच्या टीमची घोषणा केलीय. या खेळाडुंमध्ये तेजतर्रार बॉलर मोहम्मद शमीच्या नावाचाही समावेश आहे... पण, ही निवड मात्र वादात अडकलीय.
बंगाल क्रिकेट संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शामी सध्या खेळण्यासाठी फीट नाही. शमीला फिट होण्यासाठी काही आणखीन काही काळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मात्र, याउलट निवडसमितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मात्र मोहम्मद शमी फीट आहे आणि तो चांगलं खेळत असल्याचं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झाल्यानंतर मोहम्मद शमीला कुणीही प्रॅक्टिस करताना पाहिलेलं नाही.
शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलं होतं मात्र प्रॅक्टस दरम्यान जखमी झाल्यानं त्याला भारतात परतावं लागलं.
टीम इंडिया स्कॉड - रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, महेंद्र सिंग धोनी, अजिंक्य राहाणे, सुरेश रैना, युवराज सिंह, आर अश्वीन, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, हरभजन सिंग, आशीष नेहरा, पवन नेगी, मोहम्मद शमी