पहिल्या वनडेत विजयासह धोनीने केला हा नवा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना विजयी सलामी दिली. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि कसोटी कर्णधार विराट कोहली.

Updated: Oct 17, 2016, 10:58 AM IST
पहिल्या वनडेत विजयासह धोनीने केला हा नवा रेकॉर्ड title=

धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना विजयी सलामी दिली. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि कसोटी कर्णधार विराट कोहली.

टीम इंडियाचा वनडे कर्णधार एमएस धोनीने क्रिकेटच्या मैदानावर परतताना एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

कर्णधार धोनीने पहिला वनडे सामना जिंकताना ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट विश्वातील दुसरे यशस्वी कर्णधार अॅलन बॉर्डर यांना मागे टाकलंय. धोनीने आपल्या नेतृत्वाखालील 108वा सामना जिंकला. यासोबतच 107 सामने जिंकणाऱ्या बॉर्डरना त्याने मागे टाकलंय.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंग आहे. ज्याने 165 वनडेमध्ये विजय मिळवलाय.