कर्णधार एमएस धोनीने रचला इतिहास

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक नवा रेकॉर्ड बनवलाय. तीनही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंम्पिग करणारा तो जगातील नंबर वन विकेटकीपर ठरलाय.

Updated: Jan 30, 2016, 11:21 AM IST
कर्णधार एमएस धोनीने रचला इतिहास title=

मेलबर्न : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक नवा रेकॉर्ड बनवलाय. तीनही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंम्पिग करणारा तो जगातील नंबर वन विकेटकीपर ठरलाय.

त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकारालाही मागे टाकलंय. संगकाराने ५९४ सामन्यात १३९ स्टंम्पिग केले होते. धोनीने या सामन्यापूर्वी ४१८ सामन्यात १३८ वेळा स्टंम्पिग केले. या सामन्यात युवराजच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला स्टंम्पिग करत त्याने संगकाराच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. 

त्यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर जेम्स फॉकनरला स्टंम्प आऊट करताना नवा रेकॉर्ड बनवला. ४१९ सामन्यात १४० वेळा स्टंम्पिंग करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला गेलाय. या यादीत श्रीलंकेचा रोमेश कालूविर्तणा (१०१ स्टंम्पिंग) आणि पाकिस्तानचा मोईन खान (९३) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.