१३९ वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्ड करणारा धोनी पहिला क्रिकेटर

धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल १९९ वनडे तसेच ७२ टी-२० सामने खेळलेत. धोनीच्या नावे सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Updated: Jan 5, 2017, 09:57 AM IST
१३९ वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्ड करणारा धोनी पहिला क्रिकेटर title=

मुंबई : धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल १९९ वनडे तसेच ७२ टी-२० सामने खेळलेत. धोनीच्या नावे सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा रेकॉर्ड आहे. 

क्रिकेटमध्ये १३९ वर्षांच्या इतिहासात धोनी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने तिन्ही प्रकारात ५०हून अधिक सामन्यांचे प्रतिनिधित्व केलेय. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक इतिहास रचले. 

वनडे वर्ल्डकप, पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद, टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल असे अनेक आनंदाने क्षण धोनीने क्रिकेट चाहत्यांना दिलेत. कधी कधी तर त्याने स्वत:च्या खेळीच्या जोरावर सामने जिंकलेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ११० वनडे आणि २८ टी-२० सामने जिंकलेत. 

तो जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्याने आयसीसीची तिन्ही जेतेपदे मिळवलीत. त्याने दोन वनडे आणि पाच टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व केले. टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याच्या नेतृत्वखाली भारत एकदा विजेता, एकदा उपविजेता आणि एकदा सेमीफायनलपर्यंत पोहोचला.