नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतचा मोठा खुलासा केलाय. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान धोनीने तो २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही याबाबतचे विधान केले.
वास्तविकपणे मी साऱ्याच गोष्टींचा विचार करतोय. दोन वर्षात काहीही घडू शकते. ज्याप्रमाणे मी आता खेळतोय त्याप्रमाणे मी खेळत राहिलो तर नक्कीच २०१९च्या वर्ल्डकपमध्ये मी खेळू शकेन असा विश्वास धोनीने यावेळी व्यक्त केला.
मात्र त्यासोबतच धोनी असंही म्हणाला की, दोन वर्षात काय होईल हे आता सांगू शकत नाही. दोन वर्षे म्हणजे मोठा कालावधी आहे. विशेषकरुन भारतीय क्रिकेट संघाचे शेड्यूल पाहिल्यास हा कालावधी मोठा असतो. त्यामुळे दोन वर्षानंतर तुम्ही विंटेज काहही होऊ शकता.
दरम्यान, २०१९मध्ये धोनी खेळल्यास तो विकेटकीपर म्हणून खेळेल वा फलंदाज म्हणून याबाबत त्याने कोणतेही विधान यावेळी केले नाही.