पर्थ : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्षेत्ररक्षणावेळी नेहमी अॅक्टिव्ह असतो. विकेट किपिंग करताना त्याला आपल्या क्षेत्ररक्षावर नजर ठेवता येते. त्याच्यासाठी हा अॅंगल सर्वात चांगला आहे.
धोनी विकेट किपिंगवेळी आपल्या सहकारी खेळाडूंना प्रोत्साहन देताना नेहमी सूचना करीत असतो. तो काय बोलतो, याची माहिती स्टंपमध्ये बसविलेल्या माईकमध्ये कैद झाली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळताना धोनीने आपल्या टीमला सूचना केल्यात. त्या अशा...
- या खेळाडूला पुढे येऊन मारायला भाग पाड.
- रायडू दक्ष राहा. बॅटमन्सचे पाय हलत आहेत. ते बघ आणि आपली पेस निर्माण कर. तो हॉलीबॉलप्रमाणे मध्येच उभा आहे.
- शमी थोडा मागे हो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.