होबार्ट: होबार्टमध्ये बुधवारचा दिवस श्रीलंकन बॅट्समन कुमार संगकाराच्या नावे राहिला. स्कॉटलंड विरुद्ध 124 रन्स करून संगकाराने आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी पूर्ण केली. वनडेमध्ये सलग चार सेंच्युरी ठोकणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला.
श्रीलंकाचा कुमार संगकाराने नुकतेच 14,000 रन्स पूर्ण केले. एवढंच नव्हे तर स्कॉटलंडविरुद्ध वर्ल्डकपमध्ये संगकाराने एक-दोन नाही तर तब्बल 26 रेकॉर्ड्स तोडले.
पाहूया त्यातील काही निवडक रेकॉर्ड्स-
- संगकारा वनडे मॅचमध्ये सलग चारवेळा सेंच्युरी करणारा जगातील पहिला बॅट्समन ठरलाय.
- संगकाराने या सेंच्युरीमुळे वेगवेगळ्या बाबतीत 26 खेळाडूंना मागे टाकलंय.
- या वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशविरुद्ध नॉटआऊट 105, इंग्लंड विरुद्ध 117 नॉटआऊट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 रन्स आणि आज स्कॉटलँडविरुद्ध 124 रन्स केलेत.
- संगकारा एका वर्ल्डकपमध्ये चार सेंच्युरी करणारा जगातिल पहिला बॅट्समन ठरलाय. त्याने मार्क वॉ (1996), सौरव गांगुली (2003) आणि मॅथ्यू हेडन (2007)चे रेकॉर्ड मोडलेत, ज्यांनी पहिले टुर्नामेंटमध्ये तीन-तीन सेंच्युरी केल्या आहेत.
- हे पहिल्यांदाच घडलंय जेव्हा वनडे सीरिज किंवा टुर्नामेंटमध्ये कोणता बॅट्समन चार सेंच्युरी करण्यात यशस्वी झाला.
- यापूर्वी 17 वेळा कोणत्या सीरिज आणि टुर्नामेंटमध्ये खेळाडूंनी तीन-तीन सेंच्युरी बनवल्या होत्या. संगकाराने आता हा रेकॉर्ड मोडलाय.
- संगकाराने आज आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी केलीय. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरीचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर (49)च्या नावे आहे. त्यानंतर रिकी पॉटिंग (30) आणि जयसूर्या (28) च्या नावे आहे. दिलशानने सुद्धा या मॅचमध्ये आपली 22वी सेंच्युरी पूर्ण करून गांगुली, गिब्स, क्रिस गेल आणि विराट कोहलीची बरोबरी केलीय.
- आपल्या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या जमीनीवर 2000 वनडे रन्स पूर्ण केले. ते डेसमंड हेन्स (3067) आणि विव रिचर्ड्स (2769) नंतर हा रेकॉर्ड करणारा तिसरा गैर ऑस्ट्रेलियन बॅट्समन आहे.
- संगकाराने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आतापर्यंत 2038 रन्स केले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियात आपली पाचवी सेंच्युरी केली. जो की श्रीलंकेकडून नवा रेकॉर्ड आहे.
- संगकाराने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 496 रन्स केले आहेत. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स करणारा तो बॅट्समन ठरलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.