मलिंगाशिवाय मुंबई इंडियन्स मैदानात

आयपीएलच्या नवव्या सिझनला आजपासून सुरुवात होत आहे. मागच्या वेळी आयपीएलची चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स यंदा त्यांच्याकडे असलेली आयपीएल ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

Updated: Apr 9, 2016, 05:30 PM IST
मलिंगाशिवाय मुंबई इंडियन्स मैदानात title=

मुंबई: आयपीएलच्या नवव्या सिझनला आजपासून सुरुवात होत आहे. मागच्या वेळी आयपीएलची चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स यंदा त्यांच्याकडे असलेली आयपीएल ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

पण मुंबईला यंदाच्या मोसमामध्ये कमी जाणवेल ती लसिथ मलिंगाची. आत्तापर्यंतच्या 8 सिझनपैकी 2 वेळा मुंबईनं आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या दोन्हीवेळी मलिंगानं मोठं योगदान दिलं आहे. एवढच नाही तर मलिंगा हा आयपीएलमधला सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. 

दुखापतीमुळे मलिंगा आयपीएलचा पहिला भागात खेळू शकणार नाही, तर नंतरही तो खेळेल का नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे मलिंगाची जागा कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मुंबईच्या टीमवर नजर टाकली तर न्यूझीलंडचा मिचेल मॅकलेनगन, टीम साऊदी आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून चमकदार कामगिरी करणारा जसप्रित बुमराह आहेत. मलिंगाप्रमाणेच बुमराहकडेही यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे.  

तर हरभजनचा अनुभवही मुंबईच्या कामाला येऊ शकतो. त्यामुळे या खेळाडूंनी आपल्या नावाला अनुसरून कामगिरी केली तर मुंबईला मलिंगाची कमी भासणार नाही.