close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

Updated: Apr 30, 2016, 06:15 PM IST
मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

मुंबई : आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

पंजाबमध्ये मुरली विजय हा चांगला खेळ खळतोय. त्यामुळे आता संघाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. मुरली विजयला पंजाबचा कर्णधार करण्यात आलं आहे.

आतापर्यंत पंजाबची कामगिरी एवढी चांगली नाही आहे त्यामुळे मागच्या ५ मॅचमध्ये पंजाबला पराभव स्विकारावा लागला. मिलरने ६ मॅचमध्ये फक्त ७६ रन्स केले आहे. त्यामुळे आता मुरली विजयची जबाबदारी वाढली आहे आणि तो टीमला पुन्हा स्पर्धेत आणण्यात यशस्वी होतो का याचीच आशा पंजाबच्या चाहत्यांमध्ये असेल.