लंडन : वर्ल्ड नंबर राफेल नदालला तू पराजित करू शकत नाही, असा टोमणा आईने मारल्यामुळे चिडून विम्बल्डनमध्ये तरुण वादळ ठरलेल्या निक किर्गीयोस चक्क नदालला हरवले.
जगातील नंबर वन खेळाडू राफेल नदालला हरविण्याची प्रेरणा आपल्या आईच्या टोमण्यामुळे मिळाल्याची कबुली निकने दिली आहे.
जागतिक क्रमवारीत १४४ क्रमांकावर असलेल्या १९ वर्षीय किर्गीयोस यांने सांगितले की, मूळची मलेशियन असलेली आई नोरलैलाचे मानणे होते की दोन वेळेचा वर्ल्ड चॅम्पियन नदाल विरोधात जिंकण्याची शक्यता कमी आहे. आपल्या आईला खोटे ठरविण्यासाठी त्याने विडा उचलला.
या ऑस्ट्रेलियन खेळाडून सांगितले की, मी वाचले होते की, आईचे मानणे आहे राफा माझ्यापेक्षा चांगला खेळाडू आहे. त्यामुळे मला जरा राग आला. पण मला स्वतःवर विश्वास होता की काही संधी मी निर्माण करू शकतो.
किर्गीयोस पहिल्यांदा विम्बल्डनमध्ये भाग घेत आहे. वाईल्ड कार्डाने प्रवेश मिळविलेल्या या खेळाडूने १४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता नदालला मंगळवारी चौथ्या राऊंडमध्ये ७-६, ५-७, ७-६, ६-३ ने हरवून खळबळ माजवली होती.
हा युवा खेळाडू सेंटर कोर्टवर जिंकल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला आपल्या आईशी बोलण्याची संधी मिळाली नाही पण तो म्हणाला, मी माझ्या हसणारा फोटो आईला पाठवला आहे. माझी कोणी गर्ल फ्रेंड नाही, मला खूप लवकर घराची आठवण येते, माझी बहिण आणि वडील माझ्या सोबत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.