अनंतपूर : टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता नव्या अडचणीत सापडला आहे. धोनी विरोधात आंध्र प्रदेशच्या अनंतपूर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर धोनीचा फोटो विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आला होता. त्या विरोधात त्याला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.
धोनीला या प्रकरमी २४ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे धोनी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या ठिकाणी तो १२ जानेवारीपासून ५ वन डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. हा दौरा ३१ जानेवारी संपणार आहे.
२०१३ मध्ये बिझनेस टुडेच्या एप्रिलच्या अंकात धोनीचा चेहरा विष्णू म्हणून दाखविण्यात आला होता. यामुळे त्याच्या विरोधात कर्नाटक हायकोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. तक्रारीत म्हटले होते की यात भगवान विष्णूचा अपमान केला आहे.
धोनीने यावर उत्तर देताना म्हटले की असे करायला मला कोणीही कोणत्याही प्रकारचा पैसा दिला नाही. किंवा मी या फोटोसाठी पोझ दिली आहे.