"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता"

"शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. 

Updated: Mar 9, 2015, 01:47 PM IST
"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता" title=

हैमिल्टन : "शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. 

वर्ल्डकपमध्ये जसा निडरपणे शिखर खेळतोय तसा तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिशेल जॉनसन,मिशेल स्टार्क यासारख्या गोलंदाजांचा सारखा सामना करण्याचं दडपण शिखर आणि भारतीय फलंदाजांवर होतं.

 "वर्ल्डकपचं वातावरण पूर्णत: वेगळ असतं, त्यामुळे भारत वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करेल यावर विश्वास होता" असे गांगुलीने सांगितले आहे. भारतीय गोलंदाजांची कामगिरीही उत्कृष्ट आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव यांची कामगिरीही प्रशंसनीय आहे. मोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे.