मुंबई : ख्रिस गेलला सध्या तुम्ही हेडलाईनपासून दूर ठेऊ शकत नाही. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
ख्रिस गेलने काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराशी बोलतांना, वाचाळपणा केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला होता, तसेच त्याच्यावर टीकाही झाली होती.
यानंतर ख्रिस गेलने आणखी एका पत्रकाराची छेडछाड केली आहे, पण नशीब यावेळेस त्याने एका पुरूष पत्रकाराशी असं केलं.
ख्रिस गेलला यातून मागील प्रसंगाची आठवण करूनच द्यायची असेल, म्हणजे यापूर्वी जे झालं, त्यावर ख्रिस गेलला कोणताही खेद किंवा खंत नाही.
उलट तो हे सर्व एन्जॉय करतोय, हे खरं, पाहा या व्हिडीओत ख्रिस गेलने नेमकं काय केलं.