पाक क्रिकेटपटूंवर फिल्डिंग कोचशी गैरवर्तनाचा आरोप

पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या विश्वचषक मोहिमेला आणखी एक झटका मिळाला, पाकिस्तानी संघाचे फिल्डिंग कोच ग्रँट लुडेन यांनी ज्येष्ठ पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार नोंदवली आहे.

Updated: Feb 18, 2015, 11:30 PM IST
पाक क्रिकेटपटूंवर फिल्डिंग कोचशी गैरवर्तनाचा आरोप

अॅडलेड : पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या विश्वचषक मोहिमेला आणखी एक झटका मिळाला, पाकिस्तानी संघाचे फिल्डिंग कोच ग्रँट लुडेन यांनी ज्येष्ठ पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार नोंदवली आहे.

 पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून याबाबत पुष्टी करण्यात आली नसली, तरी लुडेन यांनी शाहिद अफ्रिदी, अहमद शहजाद आणि उमर अकमल यांच्याविरुद्ध तक्रार केल्याचे समजते. या तिघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुडेन यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना एका पत्राद्वारे राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. खेळाडूंकडून आपण अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. 

लुडेन यांचे पत्र मिळताच पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी संघ व्यवस्थापक नावेद चिमा, प्रमुख कोच वकार युनूस आणि लुडेन यांच्याशी संवाद साधल्याचे सूत्रांकडून समजते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.