भारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान

 टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे. 

Updated: Mar 25, 2016, 02:14 PM IST
भारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान  title=

मोहाली :  टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे. 

आता भारताचे ४ गुण असून सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागणार आहे. भारताचा पुढील सामना रविवारी २७ मार्च रोजी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

रस्ता खूप खडतर 

सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा रस्ता अजूनही खूप बिकट आहे. भारताने तीन पैकी दोन सामने जिंकून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तरीही त्यांचे सेमीफायनलचे तिकीट पक्के नाही. 

कसे शक्य 

भारताने ऑस्ट्रेलिया पराभूत केले तर कोणत्याही गणितांची गरज पडणार नाही. भारत सहा अंकांनी थेट सेमी फायनलमध्ये पोहचणार 

पाकिस्तान अडथळा 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध आजचा सामना पाकिस्तान जाणून बुजून हरला तर ऑस्ट्रेलिया चार अंकासह दुसऱ्या स्थानावर येईल. भारताला पराभूत केल्यास त्यांचे सहा अंक होऊन ते थेट सेमी फायनलला पोहचतील. 

पाकिस्तान आजचा सामना जिंकला तर 

पाकिस्तान आजचा सामना जिंकला तर त्यांचे चार अंक होतील, त्यांचा रनरेटही अधिक चांगला आहे. त्यामुळे आजचा सामना पाकिस्तान जिंकला आणि २७ तारखेला ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले तर तिघांचे चार अंक होतील आणि त्यावेळी भारत कमी रनरेटमुळे रेसमधून बाहेर पडेल. 

समिकरणाचा 'गोंधळ'

१) भारत पुढील मॅच जिंकून ६ गुण मिळवून सेमी फायनलमध्ये थेट जाऊ शकतो. 

२) ऑस्ट्रेलियाने भारत आणि पाकिस्तान विरूद्ध आपले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे सहा गुण होतील ते थेट सेमी फायनलमध्ये जातील 

३) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होते तेव्हा त्यांचे केवळ चार अंक राहतील. 

४) ऑस्ट्रेलिया पाकिस्तानशी पराभूत झाली आणि भारतासोबत जिंकली तर त्यांचे चार अंक होतील. 

५) पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल तर त्यांचेही चार अंक होतील. 

६)  तीनही देशांचे चार अंक झाले तर रन रेटच्या आधारे अव्वल संघ सेमी फायनलमध्ये जाईल.