सचिनचं आत्मचरित्र 'प्लेईंग इट माय वे' लॉन्च

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचं आत्मचरित्र ‘प्लेईंग इट माय वे’ मुंबईत प्रकाशित होतंय.

Updated: Nov 5, 2014, 07:46 PM IST
सचिनचं आत्मचरित्र 'प्लेईंग इट माय वे' लॉन्च title=

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचं आत्मचरित्र ‘प्लेईंग इट माय वे’चं मुंबईत नुकतंच प्रकाशन पार पडलं.

यावेळी सचिनची पत्नी अंजली, भाऊ अजित, मुलगी सारा गुरु रमाकांत आचरेकर सर हेदेखील उपस्थित होते.

यावेळी, या पुस्तकाचे लेखक आणि स्पोर्टस जर्नलिस्ट बोरिया मुजुमदार, हर्षा भोगले, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री तसंच सचिनचे साथीदार राहुल द्रवीड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीदेखील त्यांच्या हृद्यात असलेल्या सचिनबद्दल आठवणी उपस्थितांसोबत शेअर केल्या.

‘मला खूप धाकधूक होतेय...’ असं या पुस्तकाच्या लॉन्चिंगपूर्वीच सचिननं म्हटल्यामुळे या पुस्तकाविषयीचं कुतूहल सचिनच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढलंय. लॉन्चिंगपूर्वी हे पुस्तक सचिननं आपल्या आईला समर्पित केलंय. 

प्रदर्शनापूर्वीच, ग्रेग चॅपल यांच्याबद्दल केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे हे पुस्तक चर्चेत आलंय. ‘ग्रेग चॅपल हे एखाद्या रिंगमास्टरसारखे वागतात’ असं या पुस्तकात सचिननं म्हटलंय. सचिनच्या या वक्तव्यानंतर त्याला हरभजन आणि झहीर खान यांनीही समर्थन दिलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.