जागतिक क्रमवारीत सिंधू टॉप ५मध्ये

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूच्याने वर्षभरात केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल ५मध्ये स्थान मिळवलेय.

Updated: Feb 18, 2017, 03:15 PM IST
जागतिक क्रमवारीत सिंधू टॉप ५मध्ये title=

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूच्याने वर्षभरात केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल ५मध्ये स्थान मिळवलेय.

अव्वल ५ मध्ये स्थान मिळवणारी सिंधू दुसरी भारतीय ठरलीये. गेल्याच महिन्यात सिंधूने सय्यद मोदी ग्रँड पिक्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता तिने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान मिळवलेय.

२१ वर्षीय सिंधूच्या खात्यात ६९३९९ पॉईंट आहेत. तर लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना या क्रमवारीत नवव्या स्थानी आहे. गेल्या वर्षीची सिंधूची कामगिरी जबरदस्त झाली होती. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर तिने चायना ओपनचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर हाँगकाँग ओपनचे उपविजेतेपद मिळवले. यासोबतच ती दुबईत झालेल्या बीडब्लूएफ वर्ल्ड सुपर सिरीजसाठीही पात्र ठरली होती.