सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

भारताची अव्वल शटलर पी. व्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. सिंधूचं हे बॅडमिंटन करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग आहे. 

Updated: Apr 6, 2017, 03:35 PM IST
सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप title=

नवी दिल्ली : भारताची अव्वल शटलर पी. व्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. सिंधूचं हे बॅडमिंटन करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग आहे. 

इंडियन ओपन सुपर सीरिज जिंकल्याचा फायदा सिंधूला रँकिंगमध्ये झाला. आणि तिनं रँकिंगमध्ये दुसरं स्थान गाठलं. 

मलेशियन ओपनमध्ये तिला पहिल्याच लढतीत आपला गाशा गुंडाळावा लागलाय. त्यामुळे आता आपलं दुसरं स्थान कायम राखण्यासाठी आगामी टुर्नामेंटमध्ये सिंधूला सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.