पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संग झी हुयान हिला हिला हरवत अंतिम फेरी गाठली.

Updated: Nov 19, 2016, 06:17 PM IST
पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत  title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संग झी हुयान हिला हिला हरवत अंतिम फेरी गाठली.

८४ मिनटे रंगलेल्या उपांत्य सामन्यात सिंधून संग झी हुयान हिला ११-२१,२३-२१,२१-१९ असे नमवले. अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूसमोर चायनाच्या सन यु हिचे आव्हान असणार आहे. 

उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारितील दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या चायनिज बिंगजियाओ हिला २२-२०,२१-१० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. 

सिंधूने चांगला खेळ करत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली. रविवारी अंतिम सामना जिंकून सुपरसीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करण्याच्या इराद्याने सिंधू मैदानात उतरेल.