अश्विनने सचिन, सेहवागलाही टाकले मागे

भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड बनवलाय. भारत वि वेस्ट इंडिज दरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. 

Updated: Aug 23, 2016, 05:31 PM IST
अश्विनने सचिन, सेहवागलाही टाकले मागे title=

बंगळूरु : भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड बनवलाय. भारत वि वेस्ट इंडिज दरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. 

चौथ्या कसोटीत पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीनही कसोटी मालिकेत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अश्विनने जबरदस्त कामगिरी केली. यासाठी अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत अश्विनने दोन शतके झळकावली. तसेच सात डावांत 17 विकेट घेतल्या. आतापर्यंत अश्विनने सहा वेळा कसोटी मालिकावीराचा पुरस्कार मिळवलाय.

या यादीत त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागलाही मागे टाकले. सचिन आणि सेहवाग यांना प्रत्येकी पाच वेळा कसोटी कारकिर्दीत मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. 

अश्विनने त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकत सहा वेळा या पुरस्कारावर नाव कोरले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पाचव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. केवळ 36 कसोटी सामन्यांत सहावेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवण्याची अश्विनने किमया साधलीये.